State Employees : आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन नियमावली जाहीर; अथवा होणार मोठी कारवाई ..

State Employees : शासकीय कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्याचे फोटो काढणे, रिल्स बनवणे आणि आपली सोशल इमेज तयार करण्याचे प्रकार सध्या सर्रास वाढतांना दिसत आहेत आहेत. 

मित्रांनो,तालुका, जिल्हा स्तरावर महसूल, पोलीस, वन विभाग, नगरविकास विभागातील विविध संस्था आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करुन, अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध चांगले असल्याचे भासवून सामाजिक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न कनिष्ठ कर्मचारी किंवा नागरिकांकडून करण्यात येतो.

State Employees New Rule

सरकारने आता त्या संदर्भात एक नवीन परिपत्रक जारी केलेले आहे.विभागाचे अधिकारी वा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ उदा. वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.परिणामी कार्यालयीन कामाचा वेळ वाया जावून कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत,नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठत राहावे लागते.

वैयक्तिक समारंभ साजरे करणेची बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार उचित नाही.

शासनाने परिपत्रकद्वारे खालील निर्देश दिले आहेत.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कार्यालय तसेच अधिनस्त सर्व कार्यालयांत यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कायर्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणेत येईल.

सरकारी कार्यालयात यापुर्वी इकडील विभागाचे अधिकारी वा कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभकार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आलेस त्या अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

हे पण वाचा ~  AI For Child Learning : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मुलांच्या शिक्षणात घडवणार क्रांती! पहा AI आधारित शिक्षण साधने, फायदे आणि आव्हाने ...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *