Retired Employees : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये-जा करतात.
निवृत्तीवेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, शासकीय रुग्णालयातील औषधोपचार,ज्येष्ठ नागरीक म्हणून रेल्वे, बँका इ.ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्यादृष्टीने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
Retired Employees Identity Card
सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी खालीलप्रमाणे नमूना विहित करण्यात येत आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत शासकीय अधिकारी /कर्मचारी यांचे ओळखपत्र वर खालील बाबींचा समावेश असणार आहेत.
- ज्या विभाग/कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्याचे
- नाव व पत्ता
- छायाचित्र
- सेवानिवृत्तीच्या जी धारण केलेले पद
- सेवानिवृतीया दिनांक
- आधार क्रमांk
- ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी
- ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव,पदनाम व स्वाक्षरी
- रक्तगट
- विशेष आजार
- श्रमणध्वनी / दूरध्वनी क्रमांक
- निवासी पत्ता
सदरील ओळखपत्र अहस्तांतरणीय असणार आहे. ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणा-या कार्यालयाकडे परत पाठवावे लागणार आहे.सर्व प्रशासकीय कार्यालये / विभाग यांना सूचित करण्यात येते की, सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत. ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवावी लागणार आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक २०१७०६२३१७५९४२६२०७ असा आहे. तसेच डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित्त करण्यात येत आहे.


There must be Id No.on I’d card
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वरील प्रकारचे ओळख पत्र कसे मिळेल. याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.